प्रशिक्षण केंद्र उभारणी
आदिवासी युवक-युवती यांच्या करिता राज्य परिवहन महामंडळामार्फत वाहन चालक प्रशिक्षण देण्यासाठी शहादा येथे प्रशिक्षण केंद्र उभारणे.
प्रशिक्षणार्थींना रा. प. महामंडळ चालक पदावर नियुक्ती प्रदान करणे.
निधी प्राप्त (५३४ लाख)
राज्य परिवहन महामंडळामार्फत सुधारित प्रस्ताव प्राप्त झालेला आहे.
सुधारित प्रस्तावानुसार योजनेच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
राज्य परिवहन महामंडळास सामंजस्य कराराचे प्रारूप पाठवण्यात आलेले आहेत.
राज्य परिवहन महामंडळासोबत सामंजस्य करार करून योजना कार्यान्वित करण्यात येईल.
निसर्गोपचार केंद्र निर्मिती
राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था यांचे मदतीने आदिवासी तरुण युवक व युवतींसाठी आदिवासी आश्रम शाळा, गोहे बुद्रुक ता. आंबेगाव जि. पुणे येथे निसर्गोपचार केंद्राची निर्मिती करून मसाज थेरपी, योग शिक्षक, फिटनेस ई. विषयांवर प्रशिक्षणे आयोजित करण्यात येत आहे.
निधी प्राप्त : १४३ लाख
निधी वितरीत : १६.७० लाख
एकूण प्रशिक्षणार्थी : ४५
Sr. No. | Name of Course | No of Hrs | Fees | Remark & Duration |
1 | TATC | Rs. 5000/- per month per student | Additional Sstipend of Rs.3000 per tirbal student for 12 months. | |
2 | Certificate Course in Massage Techniques | 360 Hrs | Rs. 15,000/- | Stipend of R. 3000/- per tribal student for 3 months. |
3 | Certificate Course in Fitness Training | 60 Hrs | Rs. 10,000/- | Stipend of R. 3000/- per tribal student for 15 days. |
4 | Registered Yoga Teacher Training Course | 200 Hrs | Rs. 25,000/- | Stipend of Rs. 3000/- per tribal student for 2 months |
5 | Cerificate Course in Naturopathy Cooking | 50 Hrs | Rs. 15,000/- | Stipend of Rs. 3000/- per tribal student for 15 days. |
आदिवासी युवक व युवतींना Treatment Assistance Training Cource (TATC) या एका वर्षाचा अभ्यासक्रम प्रशिक्षणासाठी National Institute of Neturopathy (NIN) Pune यांचे कडून प्रति विद्यार्थी प्रति महा रु. ५०००/- व शबरी महामंडळाकडून रु. ३०००/- प्रमाणे शिष्यवृत्ती देण्याचे नियोजन आहे.
जानेवारी २०२१ मध्ये या अभ्यासक्रमासाठी २० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. तसेच जानेवारी २०२२ पासून ११ विद्यार्थ्यांनी व १४ विद्यार्थी असे एकूण २५ प्रशिक्षणार्थींची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण आदिवासी आश्रम शाळा, मु.पो. गोहे बु. ता. आंबेगाव जि. पुणे येथे देण्यात येत आहे.
शबरी महामंडळाकडून National Institute of Naturopathy (NIN) Pune यांना सदर योजनेकरिता निधी देणेसाठी शबरी महामंडळाचे शाखा कार्यालय जुन्नर यांना एकूण रु. १६.७ लक्ष निधी वर्ग करण्यात आलेला आहे.
सद्यस्थितीत शबरी महामंडळाकडे रु. १२६.३ लक्ष इतका निधी शिल्लक आहे.
सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण
महाराष्ट्र माजी सैनिक कोर्पोरेशन मर्या. यांचे मदतीने आदिवासी युवक व युवतींसाठी भरती पूर्व प्रशिक्षण देणे.
निधी प्राप्त : १०० लाख
निधी वितरीत : ४५.२८ लाख
एकूण प्रशिक्षणार्थी : १८५
Fill The Below Form and Star Searching