शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाची स्थापना शासनाचे आदिवासी विकास विभाग मंत्रालय, मुंबई, शासन निर्णय क्रमांक आविम-२३९६/४५/प्र.क्र.३९/ का-३ मुंबई दिनांक ९ डिसेंबर १९९८ अन्वये करण्यात आलेली आहे.
महामंडळाची नोंदणी कंपनी कायदा १९५६ अन्वये रजिस्टर ऑफ कंपनीज यांच्याकडे करण्यात आली असून कंपनीचा नोंदणी क्र.२५-१३२४९/१९९९ दिनांक १५ जानेवारी, १९९९ हा आहे. शबरी महामंडळाचा CIN NO. U74210MH1999SGC118747 असा आहे.
अ) अनुसूचित जमातीच्या व्यक्तीच्या आर्थिक विकासासाठी व कल्याणासाठी स्वतःच्या जबाबदारीवर किंवा सरकार, संवैधानिक संस्था, कंपन्या, भागीदारी संस्था, व्यक्ती यांच्या सहयोगाने किंवा अशा संघटना, अभिकरणे यांच्या मार्फत कृषी उद्योग लघु उद्योग, वाहतूक, वैद्यकीय, अभियांत्रिकी सारखा इतर धंदा/व्यवसाय, व्यापार किंवा कार्यालय यांच्या माध्यमातून योजना आखणे, प्रचलित करणे, मदत करणे, सल्ला देणे, सहाय्य करणे, वित्तीय सहाय्य देणे, संरक्षण देणे आणि विविध उपक्रम हाती घेणे.
ब) आर्थिक स्थिती/पद्धती आणि उत्पादन निर्मिती, व्यवस्थापन आणि विपणन यांच्या तंत्राचा विकास करण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यात अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस समर्थ बनविण्यासाठी कामधंदा, व्यवसाय, व्यापार किंवा कार्य चालू करण्यासाठी भांडवल कर्ज मिळविण्याची साधने सामुग्री आणि तांत्रिक व्यवस्थापकीय सहाय्य देण्याची तरतूद करणे.
क) आदिवासींच्या आर्थिक उन्नतीसाठी योग्य ते आवश्यक वाटणारे इतर कार्य करणे.
शासन निर्णय क्र. आविम-२००४/प्र.क्र.१५/ का.३ दि.२४ ऑगस्ट, २००४ नुसार शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल रु. १०० कोटी वरून रु. २०० कोटी इतके करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.
यापैकी ५१% भाग भांडवल वर्गणी राज्य शासनाची राहील तर ४९% भाग भांडवल केंद्र शासनाकडून उभारावयाचे आहे. त्या अनुसार राज्य शासनाने रु. १०२ कोटी तर केंद्र शासनाने रु. ९८ कोटी इतके भाग भांडवल भरणा करावयाचे आहे.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने राज्यातील आदिवासी बांधवांनी तयार केलेले प्रिमियम उत्पादनांचा शबरी नॅचरल्स या नावाने ब्रँड तयार केला आहे. या ब्र्ँडच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विविध प्रिमियम उत्पादनांची भेट आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके आणि आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव डॉ विजय वाघमारे, व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे आदी उपस्थित होते.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांच्या दैनंदिनी, कॅलेंडर आणि शुभेच्छापत्र यांचे अनावरण आदिवासी विकास मंत्री मा. प्रा. डॉ. अशोक उईके, आ. राजेश पाडवी, आ. किरण लहामटे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे आणि शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
Fill The Below Form and Star Searching